सातारा शहरातील नागरिकांना सर्व करां मध्ये 25%(तीन महिने)सूट मिळावी कोरोना विषाणू साथी मुळे सर्व लॉक डाऊन सुरू आहे त्यामुळे आनेक उद्योग धंदे बंद असल्याने लोकांच्या हाताला काम नाही शहरात जमाव बंदी जवळ जवळ एक महिना उलटून गेलेले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आजून लॉक डाऊन वाढण्याची शकेता नाकारता येत नाही
तरी आपल्या पालिका क्षेत्रातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत लॉक डाऊन मुळे आपल्या पालिका क्षेत्रात कोणत्या हि प्रकारचा (अत्यावश्यक सेवा वगळून) व्यापार उद्योग आणि देवाण घेवाण जवळ पास बंद आहे आपल्या सातारा नगरीत कामगारांच्या हाताला काम नाही त्यामुळे आपल्या शहरातल्या लोकांचे दरडोई उत्पन्न मागील महिन्यात एकदम कमी झाले आहे शहरातील नागरिकांची आर्थिक स्थिती संपूर्ण पणे खालवली आहे आर्थिक वर्षाचे करसंकलन मार्च महिन्यात भरला जातो मात्र लॉक डाऊन कालावधीत पालिकेचे सर्व प्रकारचे करसंकलन न भरल्याने नागरिकांवर आजून आर्थिक भार वाढणार आहे वाढलेल्या आर्थिक भारा मुळे व पालिकेच्या सर्व कारांमुळे शहरातील नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे सातारा शहरातील नागरिकांना आर्थिक संकटातून वाचवण्या साठी आर्थिक वर्ष (2020-2021)साठीच्या सर्व करसंकलनात 25%(तीन महिनेच्या करात) सरसकट सूट देणे अत्यंत महत्वाचे आहे
सदर सूट पालिका क्षेत्रातील नागरिकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल आपणास विनंती आहे कि आपण सदर विषयात संपूर्ण लक्ष घालून सातारा क्षेत्रातील सर्व करसंकलणात २५%सरसकट द्यावी हि विनंती