भाजप नेते व माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आज झालेल्या जलमंदिर येथील जनता दरबारात शेकडो लोकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत
जनता दरबार ला जेष्ठ,तरुण, महिला , शेतकरी , कामगार आपले प्रश्न घेऊन आले होते. सर्वांनी आपल्या समस्या मांडल्या. जनतेसाठी यापूर्वी ही छत्रपती उदयनराजेंचा असाच जनता दरबार होता आणि तसाच पुढेही राहील. असेही यावेळी जलमंदिर ऑफिस मधून सांगण्यात आले
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आयोजित जनता दरबाराला जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला लोकांची कामे मार्गी लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बरेच काही सांगून जात होते