जनता सहकारी बॅंक लि. साताराच्यावतीने कोरोनाग्रस्तांसाठी एक लाख दोन हजाराची मदत  – अतुल जाधव व विनोद कुलकर्णी

52
Adv

सातारा जिल्हयाची ओळख असलेल्या जनता सहकारी बँक लि. ही नेहमीच आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर राहिली आहे. देशावर आणि राज्यावर ज्या ज्या वेळी कोणतीही आपत्ती आली तेव्हा जनता सहकारी बँकेने सढळ हाताने मदत केली आहे. सध्या देशासमोर कोरोनाचे संकट असून याकाळात पी.एम.केअर आणि मुख्यमंत्री केअरला प्रत्येकी 51 हजार जनता सहकारी बँकेच्यावतीने देण्यात येणार असल्याची माहिती भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी व चेअरमन अतुल जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

पत्रकात, जनता सहकारी बँकेने यापूर्वी दुष्काळ पडला असताना चारा छावणीसाठी मदत केली होती.  गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे जिल्हयातून जाणा-या महामार्गावर हजारो वाहनचालक अडकून पडले होते. या वाहनचालकांना फूड पॅकेटस आणि पाणी वाटप केले होते. तसेच महापुरात सांगली येथील वाचनालयाचे प्रचंड नुकसान झाले होते. या वाचनालयाला पुस्तक खरेदी करुन दान केली होती. तसेच देशावर आणि राज्यावर आलेल्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत केली आहे. यावेळी राज्यासमोर तसेच देशासमोर कोरोनाचे मोठे संकट असून लॉकडाऊनमुळे सर्वत्र काळजीचे सावट आहे. या संकटकाळात राज्याला आणि देशाला मदत करण्याचा निर्णय जनता सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी संघाने घेतला. राज्यात सी.एम. केअरला 51 हजार रुपये तर पी.एम.केअरला 51 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी बँकेचे चेअरमन अतुल जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाराम पवार, सेवक संचालक अनिल जठार, उमेश साठे, उमेश पाटील, विनोद शिंदे, राजन घोणे, निलकंठ सुर्वे, हमीद शेख, राजेंद्र साळुंखे, सुरेंद्र वारद यांनी पुढाकार घेतला आहे. 

Adv