राष्ट्रीय आर्किटेक्चरल डिझाईन पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

71
Adv

सातारा नगर परिषदेच्या नियोजित भव्य प्रशासकीय इमारतीचा आराखडा अंतिम करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने व दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्कीटेक्टस् च्या सातारा शाखेने वास्तूविशारदांसाठी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी चा पारितोषिक वितरण सोहळा आज सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
सोहळ्याच्या उद्घाटन माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष सौ माधुरी कदम उपनगराध्यक्ष किशोर शिंदे मुख्याधिकारी शंकर गोरे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते

यामध्ये प्रथम क्रमांक Veekas Studio, Pune यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक DESIGN CHORDS,Pune यांनी तर Cause – an initiative, Nashik यांनी तिसरा क्रमांक पटकावला, विजेत्यांना स्मृतीचिन्ह व रोख रकमेचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात येणार आले तसेच या स्पर्धेमध्ये देशविदेशातील २०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी दाखल झालेल्या ११८ इमारत आराखड्यातील निवडक आराखड्यांचा समावेश असलेल्या कॉफी टेबल पुस्तकांचे प्रकाशन ही सन्माननीय अतिथींच्या हस्ते यावेळी होणार आहे. समारंभस्थळी सर्व जनतेला पाहण्यासाठी निवडक इमारत आराखड्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे, ते दि. १२ व १३ नोव्हेंबर साठी खुले असणार आहे.

याप्रकारचा हा पश्चिम महाराष्ट्रातील पहीलाच समारंभ असल्याने सर्व सातारकर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व वास्तूकलेच्या अमूर्त आविष्काराचा आनंद घ्यावा.

Adv