सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायदा २००३ या कायद्या अंतर्गत कलम ६ (ब) नुसार शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड (९१.४४ मीटर) परिसरात कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी केलेली आहे. असे असताना सुद्धा या कायद्याचे उल्लंघन करत विक्रेते शाळा, महाविद्यालच्या १०० यार्ड (९१.४४ मीटर) परिसरामध्ये तंबाखू विक्री करताना आढळून आल्याने जिल्हास्तरीय पथकाद्वारे विक्रेत्यांवर 2 नाव्हेंबर रोजी कारवाई करण्यात आली.
या पथकाद्वारे सातारा शहरातील शनिवार पेठ, मल्हार पेठ, मंगळवार पेठ आणि कोरेगाव मधील लक्ष्मीनगर या भागातील शाळेच्या परिसराची तपासणी केली असता एकूण ८ तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून १ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारची कारवाई जिल्ह्यात सर्वत्र राबविण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजोग कदम यांनी दिलेल्या आहेत.