गुडगुडी बाबाला चोपल्याने पालिका कर्मचारी खुश

47
Adv

सातारा पालिकेच्या गुडगुडी बाबाची राजकीय मस्ती शनिवारी यवतेश्वरच्या घाटात उतरली पालिकेच्या वाहनाने कासवरून माघारी येणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतल्या या गुडगुडी बाबाला किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या भांडणातून एका तळ्यावरच्या युवकांनी चोप दिल्याने पालिकेतील काही कर्मचारी व अधिकारी खूष असल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले

सातारा शहरातील करोना प्रतिबंधाची मोठी जवाबदारी सातारा पालिकेच्या आरोग्य विभागावर आहे . या विभागाचा लाडावलेला आरोग्य निरीक्षक याचा राजकीय मस्तवालपणा दाखवणारा आणखी एक किस्सा शनिवारी उघड झाला . आधी दुबई वारी मग क्वारंटाईन नियमाचा भंग, नंतर आरोग्य विभागाशी हुज्जत, पालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या टक्केवारीची रेकॉर्ड सीडी, या गुडगुडी बाबाने चुकांची कर्मदरिद्री अक्कल तरी किती पाजळावी . शनिवारी पुन्हा पालिकेच्या आरोग्य विभागाची अब्रू चव्हाट्यावर टांगण्यात त्यांनी कोणती कसर ठेवली नाही . कसबसं प्रकरण शांत होऊन तवेरा चालकाने गुडगुडी बाबाला गाडीत घालून माघारी आणले तर यवतेश्वरच्या घाटात त्यांची साताऱ्यातील एका तळ्यावरच्या युवकांशी बाचाबाची झाली . तेव्हा संतापलेल्या युवकांनी घाटातच गुडगुडी बाबाला चांगलाच चोप देत त्याचे चंद्रावर गेलेले विमान जमिनीवर आणल्याने पालिकेतील काही कर्मचारी अधिकारी वर्ग खुश असल्याचे चित्र पालिकेत पाहायला मिळाले

गुडगुडी बाबाच्या अगाध राजकीय लीला या चौकटी बाहेरच्या असल्याने त्या पचवताना पालिका प्रशासनाचा जीव घाबराघुबरा होतो . पालिकेच्या परिवहन विभागाची गाडी प्रशासनाच्या परवानगी शिवाय बाहेर कशी गेली ? हा प्रश्न ओघाने उपस्थित होतो .

क्रमश

Adv