एवढया तक्रारी होऊनही गुडगुडी बाबावर कारवाई होत नसून गुडगुडी बाबाचा कारभार म्हणजे आंधळा दळतंय कुत्र पिठ खातय अशीच आहे अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अशोक मोने यांनी सातारानामाशी बोलताना दिली
पालिकेच्या जबाबदार आरोग्य निरीक्षकाने स्वतःच्या मौजे साठी पालिकेची गाडी घेऊन जाणे त्यानंतर चोपखाने अशया सर्व प्रकारात गुडगुडी बाबाचा संबंध आहे या सर्व प्रकरणांवर मुख्याधिकारी कानावर हात ठेवून असल्याने सातारकर नागरिकांनी कोणाकडून अपेक्षा करायची अशीच झाली आहे
मुख्याधिकारी साहेब तुम्हाला वेध लागले ते परतिचे व घाईगडबडीने बिल काढून लक्ष्मी दर्शनाचे म्हणून तर तुम्ही गुडगूडी बाबाला अभय देत आहात अभय देऊन जाता येणार नाही मुख्याधिकारी साहेब तुमची ही कुंडली सातारा नामाकडे आहे एवढे ध्यानात ठेवा