गुडगुडी बाबाचा भक्कम पुरावे असताना का केली नाही मुख्याधिकार्‍यांनी कारवाई

41
Adv

मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे गुडगुडी बाबाचा व इतर अधिकाऱ्यांचा भक्कम पुरावा तुमच्या खिशात असताना त्यांच्यावर का कारवाई केली नाही हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे

पालिकेचे अभियंता भाऊसाहेब पाटील कोरोना सारख्या महा मारीत उत्कृष्ट काम करूनही त्यांच्यावर कारवाईचे आदेश आपण देणार असून त्यांनी कामात कसूर केली असेल तर त्यांना आपण नोटीस काढू शकता तो तुमचा अधिकारी आहे गुडगुडी बाबा प्रकरणी नोटीस ची विचारना सुद्धा गेल्या एक महिन्यापासून आपण केली नाही सातारकरांच्या कराचा पैसा खाणाऱ्या अधिकार्‍यांवर तुम्ही कृपा दाखवता व उत्कृष्ट काम करणाऱ्या भाऊसाहेब पाटील यांच्यावर वक्रदृष्टी दाखवता हा विरोधाभास का असा सवाल सातारकर जागरूक नागरिक विचारू लागले आहेत

मात्र एकीकडे गुडगुडी बाबा सह काही अधिकाऱ्यांची लक्ष्मीची धुन चा प्रकार पालिकेत घडला असून त्याचा भक्कम पुरावा आपल्याकडे असताना तुम्ही त्याबद्दल साधी कारवाई करण्याची तसदी घेतली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल शेवटी दर्शन लक्ष्मीचे म्हणल्यावर सगळे जय लक्ष्मी माता म्हणणारच ना मुख्याधिकारी साहेब तुम्हाला कारवाई करायची असेल तर पहिली गुडगुडी बाबा व इतर अधिकार्‍यांवर करा तरच तुम्ही प्रशासनाचे प्रमुख म्हणून घ्याल अन्यथा चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे होणार हे नक्कीच

Adv