पालिकेच्या एका विभागातील मलिदा मिळावा यासाठी गुडगुडी बाबा बिल न काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसते
वार्षिक ठेकेदार यांच्याकडून लाखो रुपये वर्षाचा मलिदा खाऊन मस्तवाल झालेला गुडगुडी बाबा आता त्याच ठेकेदाराचे बिल अडवून ठेवलयाची घटना पालिकेत पहावयास मिळते अर्थातच या सर्व गोष्टीला मुख्याधिकारी यांचा पाठिंबा तर असणारच म्हणून एवढी डेरिंग त्या मस्तवाल गुडगुडी बाबाची झाली असावी असे मत संबंधित ठेकेदाराने सातारानामाशी बोलताना सांगितले
गुडगुडी बाबाचे दोन साथीदार चंगू-मंगू हेही यामध्ये सामील आहेत त्यांचा परदा ही लवकरच सातारानामा फाश करणार आहे गुडगुडी बाबा आता स्वतःला राज्याचा शाडो राज्यमंत्री व पालिकेचा शाडो मुख्याधिकारी समजत असल्याचे चित्र सध्या पालिकेत दिसत आहे