मुख्याधिकारी गोरे यांच्या बदलीने साताऱ्यात केक कापून आनंद उत्सव साजरा

54
Adv

साताऱ्याचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीने साताऱ्यात केक कापून आनंद साजरा करण्यात आला

मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीने साताऱ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून आनंद साजरा केला यावेळी विविध मान्यवर सर्वसामान्य टॅक्स धारक नागरिक उपस्थित होते मुख्याधिकारी गोरे यांच्या काळातच भ्रष्ट अधिकारी यांचे प्रकरण चांगलेच गाजले होते त्यांना ते पाठीशी घालत असल्याचा आरोप उपस्थित नागरिक व सर्वसामान्य जनतेने केला त्यांच्या बदलीने सातारकरांनी सुटकेचा निश्वास टाकला असून येणार काळात भरपूर विकास कमी होतील अशी आशा ही सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी व्यक्त केली

एखादा अधिकारी बदलून जातो तर खूप दुःख होते मात्र साताऱ्यात घडले उलटेच मुख्याधिकारी गोरे हे बदलून गेल्यानंतर सातारच्या नागरिकांना केक कापून आनंदोत्सव साजरा करावा लागला यासारखे दुर्दैव तरी काय म्हणावे खरोखर त्यांनी सातारकर नागरिकांसाठी जर काम केले असते तर ही आज वेळ आली नसती असेही या नागरिकांचे म्हणणे होते गोरे यांच्या लबाडी मुळे बरेच मोठे दुर्दैवी प्रसंग साताऱ्यात घडले आहेत अशी आठवणही येथील नागरिकांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

Adv