गोरे साहेब मलिदा पण घ्या पण कारवाई तरी करा

80
Adv

व्यवस्थेतील शुक्राचार्य वाचवण्याची प्रशासनाची धडपडं
राजकीय दबावापुढे कचखाऊ लोटांगण

गुडगुडी बाबाच्या क्वारंटाईन भंग प्रकरणाला मॅनेज करण्यात मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी मोठी भूमिका बजावली आहे . वरिष्ठांशी अर्थपूर्ण वाटाघाटी घडवायच्या पण मध्यस्थांना वाचवताना त्याचेही कमिशन लाटायचे , गोरेंच्या एकूणच कचखाऊ व भ्रष्ट कारभाराचा सातारकरांना उबग आला आहे .

गुडगुडी बाबाच्या दुबई वारी मध्ये त्याला रजा देताना गोरेंनी कोणताही हात आखडता घेतला नाही . येथूनच खरी वादाला फोडणी मिळण्यास सुरवात झाली . राजकीय लागेबांधे असणाऱ्या गुडगुडी बाबावर कारवाई करण्यापेक्षा टक्केवारी आणि बडे गांधीबाबा यांची सांगड गोरे यांनी बसवली आहे . कोरोनाच्या संघर्षात गोरेंनी धाडसाने कोविड बाधिताच्या अंत्यसंस्कारासाठी सरणं रचले इतका अपवाद वगळताना एरव्ही त्यांनी गेल्या साडेतीन वर्षात कातडी बचावाची भूमिका घेतली . जिकडे गोरे तिकडे साशा हे प्रकरण त्यांनी साताऱ्यातही खरे करून दाखवले .पालिकेतल्या भ्रष्ट व्यवस्थेची शंकर गोरे ही राजकीय मध्यस्थतेची मोठी कडी आहे . पांघरूणाखाली झालेल्या चुका या अंधारात घडतात पण ज्याचा बोभाटा होतो त्या कोणत्याही गुंत्यात आपली मानं अडकणार नाही याची काळजी मुख्याधिकाऱ्यांनी घेतली . पंतप्रधान आवास योजनेची निविदा प्रक्रिया असो, की मुख्य अभियंता भाऊसाहेवांच्या रजेचे प्रकरण असो, किंवा साशा कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याचा गुंता असो गोरेंनी सातारा ते मुंबई अनेक ठिकाणी प्रशासनात मजबूत सेटिंग लावले . टक्केवारीचा बराचसा निधी त्यांनी प्रकरणे मॅनेज करण्यात रिता केला . त्यांच्यावरील चौदा प्रकरणांच्या चौकशीचा अहवाल कसा मॅनेज झाला या पाठीमागे मोठया सुरस कथा आहेत .

पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे प्रमुख दस्तुरखुद्ध खासदार उदयनराजे भोसले यांची दिशाभूल करण्यात ही गोरेंनी कसर ठेवली नाही . जुना मोटार स्टँन्डच्या दारू दुकान प्रकरणात सगळे संदर्भ न्यायप्रविष्ट असताना तिथे 52-53 च्या नोटीस काढण्याची गोरेंची राजकीय अककल सातारा विकास आघाडीला विशेषतः उदयनराजे यांना बरीच अडचणीची झाली होती .मध्यंतरी आजारपणाचे कारण देऊन गोरेंनी मोठी रजा घेतली मात्र त्यानंतरच्या त्यांच्या गुपचुप झालेल्या विदेश दौऱ्याची तक्रार अगदी तत्कालीन पालकमंत्र्यांकडे झाली होती . आधीच व्यवस्था मॅनेज आणि त्यात गोरे म्हणजे लोणच्यासारखे मुरलेले तिथेही त्यांनी आपले कसबं पणाला लावले .

मात्र सातारकरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या गुडगुडी बाबाला वाचवण्याचे जे मुख्याधिकाऱ्यांचे उद्योग सुरू आहेत ते खासदार उदयनराजे भोसले यांच्या नजरेतून सुटलेले नाही . साताऱ्यात सत्ता उदयनराजे यांची आहे . मात्र उदयनराजेंच्या आडोशाने इतरांचे राजकीय पावशेर वापरून दुकानदारी करणाऱ्यांची सर्व कुंडली सातारा नामाकडे पुराव्यानिशी उपलब्ध आहे . गेल्या साडेतीन वर्षात गोरेंनी किती टक्क्यांची माया कमविली याचे सुध्दा दाखले आहेत मात्र अडचणं आहे ती भ्रष्ट व्यवस्था मोडून काढणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीची . सातारकरांच्या सुखदुःखाशी घेण देणे नसणारे बिनबुडाचे टिनपाट आरोग्य निरीक्षक कोणाच्या जीवावर सोकावतात ? साताऱ्यात 144 कलम लागू असताना थेट गृहराज्यमंत्र्यांच्या शेजारी खुर्चीला खुर्ची लावून बसतात तेव्हा राजकीय मिजास उतू घालवणाऱ्या गुडगुडी बाबाला आणि त्याला पाठिशी घालणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना सातारकर कधीच माफ करणार नाही

. गोरेंना परतीचे वेध लागलेच होते मात्र आधी इलेक्शनं नंतर जनगणनां या निमित्ताने त्यांना मुदतवाढ मिळाली . आता तर करोना संक्रमणाचा कहर सुरू असताना शहराची आरोग्य व्यवस्था टक्केवारीची गणिते मांडत आहे . हा निर्लज्जपणा सातारकर कधीच सहनं करणार नाहीत, बारामतीचे ह पार्सल पुन्हा तिकडेच पाठवावे अशी त्यांची मागणी आहे .

Adv