घिघेवाडी येथील तिघांवर विनयभंगाचा तसेच मारहाण केल्याचा गुन्हा दाखल.

116
Adv

पिंपोडे बुद्रुक दि,२९ :- प्रतिनिधी —–
घिघेवाडी तालुका कोरेगाव येथील अक्षय सदाशिव साळुंखे,पोपट व्यंकट साळुंखे, माणिक व्यंकट साळुंखे या तिघांच्या विरोधात विनयभंग तसेच मारहाणीचा वाठार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाठार स्टेशन पोलीसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गेली दोन वर्षापासून गावातील अक्षय सदाशिव साळुंखे हा तरुण फिर्यादी पीडित महिलेच्याकडे गावातून येताजाता वाईट नजरेने बघत असतो व वारंवार फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत असतो.

दरम्यानच्या काळात पीडित महिलेचा पती गावातील कालिका मंदिरा जवळ बसले असता संशयित अक्षयने तू माझ्याकडे का बघतोस असा प्रश्न केला असता पीडित महिलेच्या पतीने संशयितास माझ्या पत्नीकडे तू वारंवार वाईट नजरेने का बघतोस, तिचा पाठलाग का करतोस असा जाब विचारला असता थांब तुला सांगतो असे म्हणून वरील संशयीत आरोपीस बोलावून घेतले व शिवीगाळ तसेच मारहाण केली व संशयित आरोपी पोपट व्यंकट साळुंखे याने पीडित महिलेच्या पतीच्या डोक्यात दगड मारल्यामुळे जखम होऊन रक्तस्त्राव झाला

तसेच फिर्यादी महिलेचा दीर अमन सावंत याला माणिक व्यंकट साळुंखे याने दगड मारल्याने पायाला मुका मार लागला. या तिघांच्या विरोधात पीडित महिलेने मारहाण केल्याचा व विनयभंगाचा गुन्हा वाठार पोलिसात दाखल केला असून पुढील तपास वाठार पोलिस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

Adv