गणेश मंडळांनी कुठलाही निर्णय घाईत घेवू नये काही मंडळांची अपेक्षा

58
Adv

कोरोना च्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव शांततेत व रद्द करण्याचा निर्णय एकीकडे होत असला तरी या निर्णयात सर्वच गणेश उत्सव मंडळ सहभागी नसल्याचे मत काही मंडळातील सभासदांनी सातारनामाकडे आपले मत व्यक्त केले

गेल्यावर्षी पुराने थैमान घातले होते त्याचे भान राखून प्रत्येक मंडळाने गणेशोउत्सव हा साधेपणाने साजरा केला होता याचे भान सर्व मंडळांना होते करोणा च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडळाने फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या परीने आपल्या आसपास मदत केली आहेच मंडळ हे सामाजिक भान राखूनच काम करत असते त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना तीव्र असल्या तरी त्यात जाणून घेणे ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मतही काही मंडळांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

करोणाचे संकट आहे हे नाकारता येत नाही हे मात्र खरे असले तरी गणेश मूर्ती मर्यादीत उंचीच्या असाव्यात की नाही याची बैठक गणेश मंडळ व मुर्तीकार लवकर घेणार असून कोरोना मुळे उत्सवाची परंपरा खंडित न होता तो साधेपणाने आणि राज्य शासन तसेच पालिकेच्या नियमांना अधीन राहून साजरा करण्याचा मानस मंडळाचा असल्याचे मतही साताऱ्यातील गणेश मंडळांनी आवर्जून सातारा नामाकडे सांगितले

साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास कोणाची हरकत नाही मात्र गणेशोउत्सव ही परंपरा खंडित होऊ नये एवढी अपेक्षा साताऱ्यातील मंडळांची असून प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष पालिका व मूर्तीकार यांची बैठक लवकरात लवकर झाली तर त्यावर तोडगा निघू शकतो प्रत्येक मंडळास आपले मत मांडण्याचा अधिकार आहेच तो कुठल्या एकट्या दुकटयाचा नसून सर्वांना विश्वास घेतले तरच गणेशोत्सव साधेपणाने व जिल्हा प्रशासनाच्या नियमात राहून साजरा होईल असे मतही मंडळांनी व्यक्त केले

Adv