ना बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने गणेश मूर्तींच्या कच्चा माल वाहतुकीसाठी जिल्ह्यांतर्गत परवानगी

61
Adv

कुंभार समाजाचे अर्थकारण अवलंबून असते ते म्हणजे गणेशोत्सवावर गणेशोत्सव जवळ आला की लगबग असते ती मूर्ती बनविण्याची परंतु यंदा कोरोनामुळे लॉकडावून जाहीर झाल्यामुळे मूर्ती व्यवसायिकांवर मोठे संकट आले असताना काही मूर्तिकार यांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली व कच्चामाल आणण्यासाठी परवानगी मागितली मूर्तिकार व पालकमंत्र्यांच्या बैठकीत कच्चा मालाच्या वाहतुकीसाठी जिल्ह्यात परवानगी दिली असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

यामुळे या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच त्यांनी नामदार बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद दिले.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कुंभारवाड्यातील मूर्तीकारांचा हंगाम वाया गेला आहे. अवघ्या सत्तर दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. कच्च्या मालाचा अभाव आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना जिल्ह्यात आणण्यास परवानगी नव्हती मात्र पालकमंत्री यांनी परवानगी दिल्याने कुंभारवाडयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

गेल्या वर्षी गणेशोत्सवाला महापुराचा फटका बसला होता. यंदा तो फटका करोनाच्या संक्रमणाने दिला आहे. गणरायाचे यंदा 22 ऑगस्टला आगमन होणार आहे. दरवर्षी करंजे, गडकर आळी, बुधवार नाका, केसरकर पेठ येथील कुंभारवाडयात एक मार्चपासून गणेशोत्सवाची लगबग सुरू होते. नागठणे, पेण, पनवेल, वाशी व दादर मार्केटमधून प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रंग इमिटेशन ज्वेलरीचे साहित्य मागवले जाते. मात्र, यंदा दोन महिने संपत आले तरी लॉकडाऊनमुळे साताऱ्याच्या कुंभारवाडयात सन्नाटा आहे. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी राजस्थानवरून प्लॅस्टर ऑफ पॅरिस, तर आंध्र प्रदेशमधून येणारा कच्चा माल वाहतुकीच्या बंदीमुळे अडकून पडला होता मात्र आता तो मार्ग मोकळा झाला आहे

जिल्ह्यात सुमारे आठ हजार टन प्लॅस्टरची आवक होत असते. आता कच्च्या मालाचा अभाव आणि इतर अडचणींमुळे यंदा श्री मूर्ती बनवण्याच्या कामात मूर्तीकारांपुढे अनेक आव्हाने आहेत.
संकट ही संधी असते. यावेळी करोनाच्या संकटात शाडू मातीच्या पर्यावरणपूरक व ठराविक उंचीच्या मूर्तीसंदर्भात सातारा पालिकेने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने निर्णय घ्यायला हवा. शाडू मातीची उपलब्धता, मूर्ती बनवण्याचा खर्च, वितरणाच्या सोयी, मूर्तीकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांचा समन्वयाने सहभाग या गोष्टी जुळून आल्या तर जिल्हयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता येईल, असे मत पर्यावरण तज्ञ यांनी व्यक्त केले.

Adv