खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष किशोर शिंदे आरोग्य सभापती अनिता घोरपडे व उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ यांनी शहरातील मुख्य ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी केली यावेळी नगरसेवक अशोक मोने अविनाश कदम श्रीकांत आंबेकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते
पूर्ण जगावर कोरोना संकट डोक्यावर नाचत असुन सातारा पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील पोवई नाका ते सातारा शहर पोलीस स्टेशन व विविध ठिकाणी आज उपनगराध्यक्ष किशोर शिंदे आरोग्य सभापती अनिता घोरपडे उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ नगरसेवक अशोक मोने नगरसेवक श्रीकांत आंबेकर नगरसेवक अविनाश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पालिकेच्या अग्निशामक गाडीतून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली
सातारा पालिकेचा आरोग्य विभाग गेल्या दहा दिवसापासून विविध ठिकाणी फवारणी फॉगिंग मशीन ने शहरात निर्जंतुकीकरण करत आहे सातारकरांना पालिकेने असे आवाहन केले आहे कि काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका प्रशासनाला सहकार्य करा पालिकेच्या वतीने आज विविध ट्रस्ट यांना निर्जंतुकीकरण करण्याचे साहित्य उपलब्ध करून दिले