पिंपोडे बु ॥ : (प्रतिनिधी) वाठार स्टेशन येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने दूध दरवाढी साठी आंदोलन करण्यात आले. सविस्तर वृत्त असे येथील भाजपा कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार स्टेशन दूध संकलन केंद्रा समोर दूध दरवाढीसाठी आंदोलन केले.आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे दुधाची दरवाढ करावी, दूध पावडर साठी 50 रुपये भाव द्यावा, दूध उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा रुपये प्रमाणे दुधाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे अशा विविध मागण्या केल्या. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाही दिल्या यावेळी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांमध्ये भाजपचे जिल्हा चिटणीस मनोज कलापट, भाजप तालुकाउपध्यक्ष राजेश काळोखे, शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, किसान मोर्चा सचिन जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धर्मेंद्र निंबाळकर, उद्योजक यशवंत पवार, संजय गायकवाड, नवल जाधव, हणमंत मांडवे तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता