सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकारी शाखाधिकारी व कर्मचारी यांना ड्रेस कोड मिळाला असून याची मान्यता नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आली
महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये एकमेव सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही सुस्थितीत चाललेली बॅक आहे म्हणून या बँकेला आजपर्यंत नाबार्ड सह विविध पारितोषिके या बँकेला मिळाली आहेत याच बँकेत अधिकारी सह कर्मचारी यांना ड्रेस कोड देण्यात आला असून .यामध्ये टाय जॅकेट व ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे
तसेच महिलांना आपल्या साडी वरती कोट सक्तीचा करण्यात आला आहे जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रात अग्रेसर असलेली एकमेव बँक आहे या ड्रेस कोड मुळे बँकेचा लौकिक अजून वाढेल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे तसेच ड्रेस कोड मुळे सर्व अधिकारी व कर्मचारी समाधानी असल्याचे चित्र जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिसत आहे