Sunday, July 12, 2026
spot_img
Home Satara District सातारा जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू*

सातारा जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू*

171
Adv

सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी सुनिल थोरवे, अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियत 2014 चे कलम (37)(1)(3) अन्वये संपूर्ण

सातारा जिल्ह्यात 1 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश सण, यात्रा व उत्सवाचे सण वगळून जारी केले आहेत. पोलीस अधिक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस स्टेानचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही.

Adv