30 सातारा जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींची निवडणुक 8 व 9 डिसेंबर 2019 दरम्यान होत आहे. या काळात सातारा जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत अशा सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील सर्व देशी दारु विक्री, विदेशी मद्या विक्री, परमिट रुम, बिअर बार, बिअर शॉपी, (सीएल-2, सीएल-3, एफएल-2, एफएल-3, फॉर्म इ, एमएलबिआर-2 इ.) अनुज्ञप्तीच्या जागा व विक्री परवाने खालीलप्रमाणे तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मतदानाच्या अगोदरचा दिवस 7 डिसेंबर रोजी अबकारी अनुज्ञप्ती असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात. मतदान 8 डिसेंबर रोजी अबकारी अनुज्ञप्ती असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात. मतमोजणी 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणीच्या ठिकाणी व अबकारी अनुज्ञप्ती असलेले संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात.
वरील कालावधीत अनुप्ज्ञतीमधून मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवावयाचे आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून यात कसूर झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.