संपूर्ण जगामध्ये कोरोणामुळे खूप मोठे संकट निर्माण झाले आहे त्याचा परिणाम अखंड भारत देशामध्ये झालेला दिसत आहे.त्यातील महाराष्ट्र राज्यामध्ये कोरनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही ऍड.बाळासाहेब आंबेडकर नेते वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आपणास विनंती करतो की खालील बाबींचा विचार करून कोरोनो संदर्भात उपाय योजनेला गती प्राप्त होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वाटचाल व्हावी. अशी मागणी देसाई यांनी केली आहे
जिल्ह्यामध्ये कोरोना आजारामुळे २ व्यक्तीचा मृत्यू झाला या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नव्हते हे आपणास ठाऊक असेलच सुदैवाने सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनो पॉझिटिव रुग्णांची संख्या कमी आहे. रेशनच्या संदर्भात अंतोयदय योजनेतिल नागरिक यांना रेशनिंगचा लाभ मिळत आहे परंतु केशरी रेशनकार्डधारक नागरिकांना सरकारने जाहीर केलेल्या योजनेप्रमाणे रेशनिंग उपलब्ध होताना दिसत नाही. त्याचबरोबर रेशनिंग कार्ड नसणारे, पालावर जगणारे भीक मागून खाणारे पारधी परराज्यातून आलेले नागरिक इतर जिल्ह्यातून आलेले नागरिक यांचासुद्धा रेशनिंगचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हा प्रश्न सुद्धा निकाली काढावा.
आपण आमच्या सूचनांचा विचार करून या कोरोनो सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये सुरू असणाऱ्या कामांमध्ये गती प्राप्त व्हावी यासाठी निवेदन. सर्वांच्या सहकार्याने निश्चितच आपण या संकटातून बाहेर पडू जिल्हाधिकारी सह प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे आरोग्य कर्मचारी डॉक्टर पत्रकार नर्सेस तसेच अत्यावश्यक सेवेतील सर्वच अधिकारी कर्मचारी कामगार यांचे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने मनस्वी आभार ही बाळकृष्ण देसाई यांनी मानले आहेत