वाठार स्टेशन येथील उघड्या जाळ्या ठरत आहेत धोका शीर

66
Adv

पिंपोडे बुद्रुक : (प्रतिनिधी)
वाठार स्टेशन येथील श्री. वाग्देव विद्यालयाजवळ छोटी मोरी वजा पूल आहे. या खचलेल्या पुलावर दोन्ही बाजूस संरक्षक कठडे नसल्यामुळे वाहनचालकांना या पुलाचा अंदाज येत नाही. यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात असाच आज दुपारी एकच्या सुमारास अपघात होता होता वाचला.

वाठार स्टेशन बाजूकडून येणारी ईरटीका कार रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे खड्ड्यात आदळली व पुलावर जाऊन उघड्या गटावरील चेंबरमध्ये अडकली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी अथवा नुकसान झाले नाही. परंतु याच पुलावर जर संरक्षक कठडे असते तर गाडी कठड्याला धडकून थांबली असती. असे वारंवार अपघात घडून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार ?अशी संतप्त वाहनचालकाची व ग्रामस्थांची प्रतिक्रिया येत आहे.

तसेच उघड्या चेंबर वर तातडीने जाळी टाकावी म्हणजे दुसरा अपघात होणार नाही. संबंधित विभागाने याची दक्षता घेऊन लवकरात लवकर उघड्या चेंबर वर जाळी टाकावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.

Adv