अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाशी सातारा जिल्हा बँकेने एमओयु करार केला असून, मराठा बेरोजगार तरुणांना व्यवसायाकरीता कर्जपुरवठा चालू केला आहे. या अंतर्गत १६८ बेरोजगार तरुणांना १४ कोटी ५६ लाखांचे कर्ज वितरण.
सातारा-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस २०१९-२० या आर्थिक वर्षात १33.९५ कोटी इतका करपूर्व तर करोत्तर १0९,९८ कोटीचा नफा झाला आहे. गेल्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा इतका विक्रमी नफा झाला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. दरम्यान, यावर्षात बँकेने ७२० सोसायट्या नफ्यात आणल्या असून यावर्षी सभासदाना १२ टक्के लाभांश देण्याची तरतूद केल्याचे त्यानी स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये केलेले कामकाज आणि भविष्यकालिन उपाय योजनाबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा बँकेने मार्च २०२० अखेर ठेवीचा सात हजार ५०० कोटीचा टप्पा ओलांडला असून बँकेकडे सात हजार लाख इतका आहे.
६२२ कोटी २८ लाख ६० हजार इतक्या ठेवी झाल्या आहेत.बँकेचा संमिश्र व्यवसाय मार्च २०२० अखे र१२ हजार ८६७ कोटी ४५ या आर्थिक वर्षात बँकेस १३३.९५ कोटी इतका करपूर्व तर १०९ कोटी ९८ लाख इतका विक्रमी करोत्तर नफा झाला आहे. गेल्या 70 वर्षात प्रथम इतका विक्रमी नफा झाल्याचे त्यांनी नमुद केले. ते म्हणाले. या आर्थिक वर्षात मार्चअखेर ढोबळ एनपीएचे प्रमाण 0.3 टक्के इतके तर निव्वळ एन पी ए शून्य टक्के ठेवण्यात बँकेला यश आले असून गेली 12 वर्षे शून्य टक्के एन.पी.ए. राखण्यात यश मिळविले आहे.
या उल्लेखनिय कामाबद्दल आरबीआय व नाबार्ड यांनी विशेष प्रकारे सन्मानित केले आहे २००७-०८ पासून बँकेचे निवळ्ळ एन. पी.ए. चे प्रमाणे शून्य टक्के राखले आहे. वसुल भाग भांडवलात विक्रमी वाढ झाली असून गेल्यावेळच्या भाग भांडवलात २७ कोटीनी वाढ होऊन यावर्षी भागभांडवल२२४ कोटी झाले आहे.बँकेच्या निधीमध्ये भरीव वाढ झाली असून, गतसालच्या तुलनेत निधीत ३१ कोटीनी वाढ झाली आहे. असेही त्यानी नमुद केले आहे.बँकेने गुतवणूकीकरीता स्वतंत्र विभागाची स्थापना केली असून सरकारी कर्जरोख्यांच्या ट्रेडींगमधून या आर्थिक वर्षात सात कोटी ११ लाखाचे उत्पन्न मिळविले आहे असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले यावर्षी जिल्ह्यातील ९५३ विकास सेवा सोसायट्यापैकी ७२० विकास संस्था नफ्यात आणणेत यश आले आहे. मागील १० बर्षाहुन अधिक काळ १० टक्केहून अधिक लाभाश दिला असून गेल्यावर्षी १२ टक्के प्रमाणे १६ कोटी २२ लारा तरतूद केली होती. या आर्थिक वर्षात बँकेच्या सभासदाना १२ टक्के लाभावंशाची तरतूद केली असून त्यासाठी २३ कोटी ९६ लाख रुपयाची तरतूद कली आहे. शेतकरी सभासदाना तीन लाखापर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने वितरीत करीत असून या वर्षासाठी पाच कोटी ७५ लाखाची तरतूद केली आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज शून्य टक्के व्याजदराने वितरीत केले असून या वितरित एक कोटी २५ लाख रक्कमेची तरतूद केली आहे. विकास सस्थानी गोडावून व इमारत बांधकामासाठी घेतलेले कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध केले आहे. त्यामाठी ४५ लाख रक्कमेची तरतूद केली आहे. चांगले काम करणान्या विकास सेया सोसायट्याच्या सचिवांना ८.३३ टक्के प्रमाणे बक्षीस पगाराची तरतूद केली आहे.
तसेच बँक अधिकारी व सेवक यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान व ४.१७ टक्के बक्षीस पगराची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत बँकेच्या दोन लाख ९० हजार कोटी २९ लाख ६० हजार इतकी आर्थिक मदत जमा झाली आहे. बँकेच्या १९ लाखांहून अधिक खातेदारांच्या पाच लाखपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्यात आले आहे. यावर्षी तीन लाख सेव्हिंग ठेव खाती जोडण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत २४७८१ सभासदांनी विमा घेतला असून, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेअंतर्गत एक लाख १० हजार ७३६ सभासदांनी विमा घेतला आहे.
बँकेचे महत्वाचे निर्णय
मोबाईल बँकिंग व्हॅनची
खरेदी ग्राहकांच्या सोईसाठी ४७ एटीएम कार्यन्वित
६५० मायक्रो एटीएम मधून दुर्गम ग्राहकांना घरपोच बँकींग
आणखी १०० एटीएम कार्यान्वित करणार
७/१२ खाते उतारा बँकेच्या शाखेत मिळणार
कोरोना निवारणासाठी दोन कोटी १६ लाखांची मदत
यशवंत किसान मंचाच्या माध्यमातून ४५ शेतकरी गट स्थापन
आत्महत्याग्रस्त पाच शेतकऱ्यांच्या वारसांना चार लाख ६१ हजार ६४५ मदत