दक्ष यंत्रणेचे पोलीस अधीक्षकांकडून लोकार्पण

278
Adv

सातारा शहरासह जिल्हा मध्ये अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांना नागरिकांची नेहमीच सहकार्य लागते . समाजात घडणाऱ्या अवैध घटना पोलिसांपर्यंत पोहोचवणाऱ्या दक्ष whatsapp प्रणालीचे लोकार्पण पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले असा उपक्रम राबवणारा सातारा जिल्हा महाराष्ट्रात पहिला ठरला आहे याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी शिवतेज हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

समीर शेख पुढे म्हणाले सातारा जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जागरूक सुजाण दक्ष नागरिकांकडून आपल्या परिसरातील अवैध धंद्या विषयी माहिती सहजरित्या पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी दक्ष व्हाट्सअप प्रणाली तयार करण्यात आली आहे .या प्रणालीचे आज लोकार्पण होत आहे .दक्ष व्हॉटस प्रणालीमध्ये 9923234100 या क्रमांकावर नागरिकांनी सुरुवातीला हाय हॅलो नमस्ते असे काहीही पाठवले तरी सदर प्रणाली सुरू होईल. त्यानंतर नागरिकांनी आपली तक्रार निवडावी व दिलेल्या पर्यायावर क्लिक करून आपली तक्रार दाखल करावी

सदर प्रणालीमध्ये नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर त्याचे नाव नंबर मात्र गोपनीय राहणार आहे. ही सर्व माहिती संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे जाणार असून यातील सर्व तपशील हा गोपनीय राहणार आहे प्रत्यक्ष तपास करणाऱ्या यंत्रणेला सुद्धा मजकुरा व्यतिरिक्त तक्रार करणाऱ्याचा कोणताही मागोवा मिळणार नाही. या प्रणालीचा मुख्य उद्देश असा सातारा जिल्ह्यातील अवैध शस्त्र, अवैध दारू, जुगार, अमली पदार्थ,अवैध गुटखा, अवैध सावकारी, व्यवसाय, अवैध वाळू वाहतूक व विक्री यासारख्या इतरांवर धंद्याची माहिती पोलीस यंत्रणेपर्यंत पोहोचवून या धंद्यांवर प्रभावी कारवाई करणे शक्य होणार आहे. या व्हाट्सअप प्रणालीचा वापर करून सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना पोहोचवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले

Adv