कालच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा माढा लोकसभा मतदार संघात दौरा झाल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व अन्य सहकार्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला उदान आलं आहे
माढा लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून कायम चर्चेत राहिला आहे कालच लोकसभा प्रवासादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माढा लोकसभा मतदारसंघात होते यांच्या दौऱ्याला 24 तास उलटत नाहीत तोपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या हालचाली सुरू झाले आहेत माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची पकड माढा मतदारसंघावर आहे यांनाच राष्ट्रवादीचे मातब्बर नेते असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व माढा मतदारसंघातील काही निवड व्यक्ती भेटल्याने नक्की माढा मतदारसंघातून निवडणूक कोण लढवणार याकडे महाराष्ट्राचे डोळे लागले असून येणाऱ्या निवडणुकीत घमासान होणार हे मात्र नक्की
मोहिते पाटील यांच्या घराण्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनीही लोकसभेसाठी शड्डू एक प्रकारे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आव्हानच दिले आहे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून मोहिते पाटील व नाईक निंबाळकर यांच्या भेटीदरम्यान बऱ्याच गोष्टींची राजकीय खलबत्ते झाले असल्याचे समजते