आ,डीबी कदम यांच्या पुतळ्याचे ना. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते अनावरण

210
Adv

जावळी महाबळेश्वरचे दिवंगत आमदार किसनवीर कारखान्याचे माजी चेअरमन डीबी कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते रविवारी दुपारी दोन वाजता आरळे येथे होणार असल्याची माहिती आयोजक अरविंद कदम यांनी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली

डीबी कदम संस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे कदम यांच्या स्मृति गेल्या अनेक वर्षापासून जागवल्या येता आहेत या प्रतिष्ठान मार्फत ग्रामस्थांच्यावतीने कदम यांच्या स्मृत्यर्थ पुर्णाकृती पुतळा आणि सांस्कृतिक भवन उभारले आहे डीबी कदम साहेबांनी आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश केला राजकारणातील प्रवेश यशस्वी झाला असेही अरविंद कदम यांनी सांगितले

नवीन पिढीला त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा या उद्देशाने ग्रामस्थांनी त्यांच्या स्मृत्यर्थ पूर्णाकृती पुतळा उभारला असून याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर ,माजी आमदार शशिकांत शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आयोजक अरविंद कदम ,बाबासाहेब कदम ,राम कदम यांनी यावेळी दिली

Adv