राजू भोसले यांच्या क्रेशर वर कारवाई करा सुधिर देसाई यांची मागणी

205
Adv

पुनवडी, ता.सातारा येथील स. न. ४९/१९ मधील ९७ आरमधील शेतजमीनीत बेकायदेशीररित्या गौण खनिजाचे उत्खनन करत नुकसान करणाऱ्या संतोष अनिल भोसले व त्यांचे बंधु राजु अनिल भोसले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती पुनवडी येथील शेतकरी सुधीर किसन देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुधीर देसाई म्हणाले. पुनवडी येथे वडिलोपार्जीत शेत जमीन आहे. काही जमिनी आम्ही खुश खरेदीने खरेदी केलेल्या आहेत. त्यामध्ये आमची पुर्वीपासुनच प्रत्यक्ष कब्जे वहिवाट असलेल्या क्षेत्रात गुरे चारत आहोत. त्याधील गवत गुरांसाठी चारा म्हणून आणत आहे. परंतू गेल्या आठवड्यामध्ये गुरे चारण्यासाठी गेलो असता
आमच्या कब्जे वहिवाटीत असणाऱ्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरु असल्याचे निदर्शनास आले. दि. २८ डिसेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला होता मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.पुनवडी येथे स.न ४६ मध्ये संतोष अनिल भोसले यांच्या नावे खाणपट्टा वा स्टोन क्रेशर आहे. तो मुळातच
बेकायदेशीर असून त्याबाबत अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत. संतोष भोसले याचे बंधु राजु अनिल भोसले हे राजकीय पदाधिकारी आहेत. त्यामुळे प्रशासनामध्ये त्याचा मोठा दबदबा आहे. संताय भोसले हे आष्टे, ता. सातारा गावचे पोलीस पाटील आहेत. त्याचा गैरफायदा घेत ते अनेक बेकायदेशीर काम करित आहेत.लोकांना दमदाटी करून अनेक बेकायदेशीर कामे सुरू आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून माझु व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही भोसले बंधूंवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. रात्रभर स्टोन क्रेशर चालवला जात असल्यामुळे ध्वनी व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असते. त्याचे पुरावे चौकशीच्या वेळी सादर करण्यात येतील, असे सांगून सुधीर देसाई पुढे म्हणाले, स्फोटासाठी सुरुंग लावण्यासाठी परवानगी घेण्यात येत नाही. पावसाळ्यामध्ये सर्वे नंबर ४५ मध्ये असणाऱ्या जमिनीत बंधारा आहे. तो क्रेशरच्या पावडरने पूर्णपणे भरून ते पाणी उरमोडी धरणात जात असल्यामुळे धरणाचे पाणी दूषित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Adv