*पिंपोडे बुद्रुक,दि.: गेल्या साडे पाच महिन्यापासून कोरोना संसर्गने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आत्ता शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. दिवसेंदिवस याचा आकडा सातशे ते आठशेच्या घरात पोहचू लागला आहे.जिल्हा आणि तालुका स्तरावरील आरोग्य विभागाकडून बाधितांना मिळणाऱ्या ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व इतर सुविधाचा अभाव,प्रशासनावरील वाढता ताण, आणि अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतं आहे. गेल्या काही दिवसापासून भागांतील अनेक रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळत नसल्याने, अनेकांच्या जीवावर बेतण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.अशा प्रसंगामुळे आगामी काही दिवसामध्ये कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पिंपोडे बुद्रुक,वाठार स्टेशन पासून दोन ते तीन किलोमीटर परिसरात ५० बेडचे स्वतंत्र कोव्हिड सेंटर सुरु करण्याच्या मागणीला जोर वाढला आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाचा कोव्हिड सेंटरसाठी विचार झाल्यास रिपाई पक्ष्याचा तीव्र विरोध असून त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मागील दोन दिवसामध्ये राऊतवाडी,अनपटवाडी आणि इतर दोन गावांतील रुग्णांना वेळेत ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर, आरोग्य सेवा मिळू न शकल्याने त्यांना प्राणाला मुकावे लागले आहे. तालुक्यात शनिवार दि.१२ तारखे पर्यंत १६५८ रुग्ण बाधित आढळले आहेत. त्यापैकी वाठार स्टेशन,पळशी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपोडे ग्रामीण रुग्णालय अंतर्गत ४०६ रुग्ण भागात बाधित आढळलें,तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण आकडेवारी पैकी संसर्ग समुह,वातावरणातील बदल व इतर कारणाने गेल्या एका महिन्यात भागात नव्वद टक्के पेशंट कोरोना बाधित आढळलें आहेत. बरे होण्याचे प्रमाण सुध्दा सकारात्मक आहे.दिवसेंदिवस प्रत्येक गावांत दररोज दोन तीन पेशंट आढळून येत आहेत. कोरोनाचा सामना व मुकाबला करुन रोजचे जीवन व येणाऱ्या अडचणीवर मात करतं,आयुष्य सकारात्मक जगले पाहिजे यात तिळमात्र शंका नाही.तसेच या कोरोना आजारातून सकारात्मक मानसिकता व योग्यवेळी उपचारामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण सुध्दा अधिक असल्याने ही सुध्दा समाधानकारक बाब आहे. मात्र या संसर्गाचे काही दिवसात या आकड्यात झपाट्याने वाढ होत चालेली आहे. खाजगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतं आहेत आणि ते सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. कोरोनाचा सामना करणारे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबावर बेतणारे प्रसंग हे त्यांनीच जाणो. या महामारीवर मात करण्यासाठी व खबरदारीची उपाययोजनेसाठी उत्तर कोरेगाव तालुक्यातील ४७ गावांसाठी या दोन्ही गावांच्या, मुख्यवस्ती, वर्दळीचे ठिकाण आणि ग्रामीण रुग्णालय परिसर सोडून ५० बेडचे, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मशीन, पी.पीई.किट, आरोग्य अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी टीम, तपासणी कक्ष, स्वतंत्र रुग्णवाहिका व इतर लागणाऱ्या सुविधासह अशा स्वरूपाचे कोव्हिड सेंटर सुरु करण्याची मागणी केली जात आहे.
———————————————-
* :— मदतीचे आवाहन—-* आरोग्य शासनाची १०८ नंबरची रुग्णवाहिका आताच्या कोव्हीडच्या काळात पेशंटला वेळेत मिळण्यासाठी,व उपलब्ध होण्याकरिता अनेक तास वाट पाहवी लागत आहे.मात्र सेंटर सुरु करतांना भागांतील सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी कोरोना योद्धे म्हणून उभे राहून या संकटमय प्रसंगी ऑक्सिजन मशीन आणि स्वतंत्र रुग्णवाहिका तात्काळसेवेसाठी उपलब्ध करुन दिल्यास कोरोना रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल …
———————————————–
—- *ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड सेंटर सुरु करण्यास तीव्र विरोध—-* सर्व सामान्य व गरीब लोकांना आरोग्य सेवा देणारे ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र ही एकमेव ठिकाण आहेत आणि या दोन्ही आरोग्य सुविधा वर्दळीच्या आणि भर लोकवस्तीत आहेत. त्यामुळे सेंटर सुरु करण्याबाबत आरोग्यकेंद्र आणि रुग्णालय सोडून, आसपासच्या एक दोन कि.मी. परिसरात सेंटर सुरु करण्यास कोणतीच हरकत नाही. मात्र रुग्णालयाचा विचार कोव्हिड सेंटर सुरु करण्याकरिता झाल्यास रिपाईचा तीव्र विरोध असून तसा निर्णय घेतल्यास आंदोलन छेडले जाईल. — (नरेंद्र वाघांबरे, उपजिल्हाअध्यक्ष रिपाई),
*चौकट —-* दिवसेंदिवस वाढत्या कोव्हिडचा सामना करण्यासाठी, ग्रामीण रुग्णालय सोडून,आरोग्य विभागाकडे कोव्हिड सेंटरची मागणी केली जाणार आहे. मात्र लोकांनी सुध्दा आरोग्यबाबत खबरदारी व काळजी घेणे गरजेचे आहे — (डॉ.सुर्यकांत बाबर,वैद्यकीय अधिक्षक- ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक )
* —* कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार स्टेशन येथे सर्वसामान्य लोकांना इतर आजार व आरोग्य सेवा मिळताना गैरसोय होणार नाही याची अत्यावश्यक काळजी घेण्याची सुध्दा गरज आहे. या दोन्ही ठिकाणच्या परिसरात दोन ते तीन कि.मी परिसरात कोव्हीड सेंटर सुरु करण्याच्या मागणीकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकप्रतिनिधी यानात्याने आपण पाठपुरावा करण्याकरिता प्रयत्नशील राहू —- मंगेश धुमाळ ( जिल्हा परिषदेचे कृषी सभापती )