ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय ७९) यांचे आज पहाटे चार वाजता कोविड न्यूमोनियामुळे साताऱ्यातील एका खाजगी दवाखान्यामध्ये निधन झाले. आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सातारा पालिकेच्या वतीने कैलास स्मशानभूमी माहुली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, एका वाहिनीवर काळूबाई मालिका सुरु आहे. या मालिकेचे चित्रिकरण जिल्ह्यात सुरु होते. चित्रिकरणादरम्यान मुंबईतील काही नर्तक कलाकार एक दिवस सहभागी झाले होते. त्यावेळी मालिकेतील काही कलाकारांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आशालता यांचाही समावेश होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते. आशालता यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या.
दरम्यान कैलास स्मशान भूमी येथे चित्रपट अभिनेत्री अलका कुबल व त्यांचे पती श्री समीर आठलये पालिकेचे आरोग्य प्रमुख सुहास पवार अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी अलका कुबल यांच्याकडे सांत्वन पत्र दिले