खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा पालिकेच्या नूतन 40 घंटागाड्या सातारकर यांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत
कोरोना च्या पार्श्वभूमीवर भव्यदिव्य उद्घाटन सोहळा न घेता साध्या पद्धतीने सातारा पालिकेने घेतलेल्या नूतन 40 घंटा गाड्या आजपासून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले उपनगराध्यक्ष किशोर शिंदे आरोग्य सभापती अनिता घोरपडे मुख्य अधिकारी शंकर गोरे उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ यांच्या उपस्थितीत सातारकर यांच्या सेवेत दाखल केल्या आहेत यावेळी आरोग्य निरीक्षक यादव, गणेश टोपे व कर्मचारी वर्ग उपस्थित होता
आरोग्य विभागाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर चांगले काम केले असल्याचा दाखलाही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला इथून पुढेही आरोग्य विभागाने असेच काम करावे सातारकरांना अजून कशी आरोग्याची चांगली सेवा देता येईल अश्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या सर्व नागरिकांनी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आव्हानही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केले