जैव समितीचा गोंधळात गोंधळ आणि मुख्याधिकाऱ्यांचा सभात्याग स्टेप- जैव समितीची रचनेवर नगरसेवकांचा आक्षेप

56
Adv

जैवविविधता समितीच्या निमित्ताने मंगळवारी पालिकेत बिना पैशाचा तमाशा झाला . ठेकेदारांची बिले मुख्याधिकाऱ्यांनी अडवली असा आरोप पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी केल्याने रागाच्या भरात मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सभात्याग केला . नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी शहरातील खड्डयांच्या निषेधार्थ खुर्चीवर उभे राहून सभागृहाचे लक्ष वेधले
.
. जैवविविधता समितीसाठी सातारा विकास आघाडी , नगर विकास आघाडी व भाजपच्या प्रत्येकी दोन सदस्यांची नावे सुचवून त्यांची समिती गठीत करण्याचा निर्णय झाला . मात्र समितीची नावे अंतिम न झाल्याने विशेष सभेचा हेतूच सफल झाला नाही . त्यानुषंगाने सातारा नगरपालिकेत ही समिती गठीत करण्याबाबत विशेष सभा गठीत करण्यात आली. मात्र, यावेळी सातारा शहरातील खड्डे आणि आरोग्यविषयक मुद्यावरून नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरले. सर्वच नगरसेववकांनी टार्गेट केल्याने मुख्याधिकार्‍यांचा राग असह्य झाला. त्यांनी खुर्चीवरून उठत माझ्याशी नीट बोला, असे सुनावत सरळ सभागृह सोडून गेले. दरम्यान, सर्वच नगरसेवक आक्रमकपणे मुद्दे मांडत असल्याने सभा पूर्ण गोंधळात पार पडली. जैवविविधता समिती गठीत करण्याबाबत नगरसेवकांना ऐनवेळी माहिती दिल्याबद्दलही मुख्याधिकारी आणि पालिका प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले. दरम्यान, मुख्याधिकार्‍यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनद्वारे केली.

प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला जैवविविधता समिती बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र सातारा नगरपालिकेला पत्र दि. 25 सप्टेंबरला आले होते. ही समिती गठीत करण्यासाठी दि. 28 नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. तसेच या समितीत नगरपालिकेतील नगराध्यक्ष या पदसिद्ध अध्यक्ष, सात नगरसेवक यासह विविध प्रशासकीय अधिकार, स्वयंसेवी संघटना यांचा समवेश असणार आहे. समितीबाबत पालिकेकडून कार्यवाही न झाल्यास प्रतिमहा दहा लाख रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे या जैवविविधता समितीचे कामकाज कसे चालणार याबाबत नगरसेवकांना इतक्या उशिरा माहिती का देण्यात आली. शासनाचे खात्याचे पत्र पालिकेला 25 सप्टेंबरला आले असताना आतापर्यंत पालिका प्रशासन काय करत होते. दहा लाख रुपये दंड झाला तर तो सर्वसामान्यांच्या करातून भरला जाणार आहे. याची जाणीव ठेवावी, अशी मागणी नगरसेवक विजय काटवटे यांनी सुरुवातीला केली. याबाबतची उपसुचना त्यांनी मांडल्यानंतर ते बोलत होते.
त्यानंतर नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी खड्डे आणि शहरातील डेंग्यूबाबत आरोग्य विभाग उपाययोजना राबवत नसल्यावरून नाराजी व्यक्त करत मुख्याधिकारी शंकर गोरे यांना धारेवर धरले. सातारा शहराची चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था आणि डेंग्यू उपाययोजना करण्याबाबत अतिविशेश सभा बोलवा. शहराची अवस्था बघून आता लाज वाटू लागली आहे, अस सांगितले.
नगरसेवक वसंत लेवे यांनीही समितीच्या माध्यमातून पालिकेला मोठा निधी मिळू शकतो. समितीच्या सदस्यांना का अवगत केले नाही, असा सवाल उपस्थित केला.

नगरसेविका सिद्धी पवार यांनी समिती कशावर काम करणार याची माहिती न दिल्याने स्वच्छ भारत प्रमाणे समितीचे कामही कागदोपत्रीच चालणार काय ? असा आक्षेप घेतला . वसंत लेवे यांनी जैवविविधता समितीच्या अनुषंगाने कार्यशाळा घेण्याची मागणी केली . चौकट- मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या निषेधाचा ठराव अशोक मोने यांनी मांडला श्रीकांत आंबेकर यांनी त्याला अनुमोदन दिले

.गोरे यांची बदली करावी या मागणीसाठी सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी व भाजपचे असे नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने गोरे यांच्या सभात्यागाची तक्रार केली .गोरे यांनी नगराध्यक्षांसह सभागृहाचा अवमान केला आहे त्यांच्या सर्विस बुकवर याची नोंद करून त्यांची नगरपरिषद संचालनालयाकडे तक्रार करण्याचा एकमुखी पाढा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे वाचण्यात आला .

Adv