जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आता स्वीय सहाय्यक बदलणार का तेच राहणार याकडे आता जिल्हा परिषदेत लक्ष लागून राहिले आहे
जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असल्याने पदाधिकारी सदस्य यांच्यात समन्वय कायम राहिला आहे परंतु काहीना काही कारणाने अध्यक्ष उपाध्यक्षचे पी ए बरेच गाजलेले आहेत अध्यक्ष निवडीच्या वेळेसच काही जणांनी सांगितले की साहेब तेवढे पीए बदला दस्तुरखुद्द जिल्हापरिषदे मधूनच ही मागणी झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले व उपाध्यक्ष प्रदीप विधाते काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून राहिले आहे