श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि शंभूराजे देसाई यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असून उदयनराजे केंद्रात आणि शंभूराजे राज्यात मंत्री होतील, असा विश्वास अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान या दोन्ही उमेदवारांना माथाडी कामगारांनी मोठे मताधिक्य देण्याचा निर्णय घेतला असून जनतेला झुलवत ठेवणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शंभूराजे देसाई यांच्या प्रचारार्थ तारळे ता. पाटण येथे आयोजित कोपरा सभेत ना.नरेंद्र पाटील बोलत होते.
अजान सुरू होताच उदयनराजेंनी भाषण थांबवले*
उदयनराजे भोसले यांनी नेहमीच सर्वधर्म समभाव याप्रमाणे आपले कार्य सुरू ठेवले आहे.जनता हेच माझे सर्वस्व असून मला पद, सत्तेची गरज नाही त्यामुळे युजिवात जीव असेपर्यंत मी जनतेसाठीच कार्यरत राहणार असल्याचे उदयनराजे नेहमी सांगतात. तारळे येथे उदयनराजे यांचे भाषण सुरू असताना मुस्लिम समाजाचा अजान सुरू झाला. यावेळी उदयनराजेंनी तात्काळ भाषण थांबवले. त्यामुळे उदयनराजेंच्या या भूमिकेप्रति उपस्थितांनी आदरभाव व्यक्त केला.