पेढ्याच्या भैरोबा चा भंडारा दिनांक 20 रोजी

59
Adv

सातारकरांचे ग्रामदैवत असलेले श्री पेढ्याचा भैरोबा चा भंडारा उत्सव दिनांक 19 व 20 रोजी होत असल्याचे ग्रामस्थ व यात्रा कमिटीने सांगितले आहे

गडकर आळी येथील हाकेच्या अंतरावर असलेल्या डोंगरात श्री पेढ्याचा भैरोबा याचे वास्तव्य आहे या देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते गडकर आळी शुक्रवार पेठ धुमाळआळी आदी भाग यात्रेमध्ये समाविष्ट केलेला आहे

याच पेढ्याचा भैरोबाचा जन्मकाळ उद्या दिनांक 19 रोजी रात्री आठ वाजता भैरोबा मंदिर येथे असून याच ठिकाणी बुधवार दिनांक 20 रोजी महाप्रसादाचे आयोजन दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेपर्यंत केले असल्याचे येथील ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने सांगितले आहे महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे

Adv