औध ता. खटाव येथील श्री यमाईदेवी यात्रेचा मुख्य दिवस 11 जानेवारी 2020 आहे. या दिवशी व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पाल ता.कराड, काशिळ ता. सातारा, खोडद, निसराळे फाटा, तारळे ता. पाटण या ठिकाणाच्या सर्व देशी दारु विक्री, विदेशी मद्या विक्री, परमिट रुम, बिअर बार, बिअर शॉपी, (सीएल-2, सीएल-3, एफएल-2, एफएल-3, फॉर्म इ, एमएलबिआर-2 इ.) अनुज्ञप्तीच्या जागा व विक्री परवाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
11 जानेवारी 2020 अनुप्ज्ञतीमधून मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवावयाचे आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून यात कसूर झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.