करसल्लागार, साहित्य, चित्रपट, प्रकाशन, अध्यात्म व सामाजिक कायर्ं अशा बहुविध क्षेत्रात आपल्या कर्तृृत्वाने सातारचे नाव उज्वल करणारे अरुण गोडबोले यांच्या अमृत महोत्सव वर्षपूर्तीनिमित्त अभिष्ट चिंतन स्नेह मेळावा रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता श्री शाहू कला ंमदिर सातारा येथे आयोजीत केला आहे.
यासाठी पद्मविभूषण पं. हरी प्रसाद चौरासिया व कणेरी मठाचे काडसिध्देश्वर स्वामी यांची प्रमुख उपसिथ्ती असून श्री.छ. शिवाजीराजे भोसले अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत. साडेचार ते सहा या वेळेत पं. हरीप्रसाद चौेरासिया यांच्या उपसिथ्तीत त्यांच्या शिष्या वैष्णवी जोशी व मुसर्रत जबीन रहमान यांचे सुमधूर बासरी वादन होणार आहे. त्यानंर अभिष्टचिंतन सोहळा रंगणार आहे. याचवेळी मधु नेने संपादित ..सर्वस्पर्शी.. या 100 अभिष्टचिंतन पर लेख संग्रहाचे आणि सौ. अनुपमा गोडबोले यांच्या ..तरीही चकोर अनन्य.. या मनमोकळ्या आत्मकथनाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास सर्व गोडबोले प्रेमी नागरिकांनी यासाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन अरुण गोडबोले मित्रमंडळातर्फे प्राचार्यं पुरूषोत्तम शेठ व नंदकिशोर नावंधर यांनी केले आहे.