सातारा शहरातल्या प्रत्येक नागरिकांच्या हिताकरता काम करण्याचा आता नवा पायंडा सुरु झाला आहे. आरोग्य विभागाच्या सभापती अनिता घोरपडे व इतरही पदाधिकाऱयांनी शहरात नव्याने एअरपोर्ट टॉयलेट बांधण्याचा केवळ विचारच नाही तर प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
येत्या काही दिवसात शहरात तब्बल सात ठिकाणी हे एअरपोर्ट टॉयलेट उभारलेली पाहयला मिळणार आहे. हे काम सातारकरकरांच्याच हिताचे असून महिलांकरताही स्वतंत्र टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे सातारा पालिका आरोग्य विभाग कात टाकू लागला आहे असेच चित्र दिसत आहे.
सातारा शहरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था लगेच होते. सरकारी शौचालय म्हटल्यानंतर त्याला वापरणारे हजार, मोडतोड करणारे अनेक बेकार दिसतील. मात्र त्याच शौचालयाचा वापर निटका करणारे कोणीही दिसणार नाहीत पालिकेकडे बोट दाखवत पुन्हा दुरुस्तीकरता पालिका निधी टाकण्याची मागणी करणारे अनेक दिसतील. त्यामुळे शहरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची वाताहत होत होती. महिलांकरता शौचालय करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाकडून शहरात नवनवे बद करण्यात येणार आहेत. त्याकरता पालिका प्रशासनाने स्थायी समितीत याचे सोपस्कार पार पडले असून येत्या काही दिवसात नव्याने होणारे एअरपोर्ट टायलेट होणार आहेत.
शहरात मोडकळीस आलेली जुनी शौचालये पाडून त्याजागी नव्याने ही शौचालये होणार आहेत. पालिका अ वर्गात असून स्वच्छ भारत अभियानातंर्गत ही शौचालये बांधण्यात येणार आहेत. 16 जागी सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 7 शौचालये ही एअरपोर्ट पद्धतीची असणार आहेत. त्यामध्ये 3 पुरुषांसाठी सीट, तीन महिलांसाठी सीट शौचालय, दोन सीट पुरुषांसाठी व दोन महिलांसाठी मुतारी, अपंगासाठी शौचालय, लहान मुलांसाठी शौचालय असणार आहे.
केअर टेकर प्रत्येक शौचालयासाठी
या सात शौचालयासाठी केअर टेकर रुम बांधण्यात येणार आहे. त्या शौचालयाची निगा काळजी राखण्याबरोबरच तो त्याची राखणही करणार आहे. तसेच शौचालयाच्या इमारतीत वॉश बेसीन, क्राँकीट रॅम्प, आरसा, हॅण्डवॉश, पाण्याची टाकी, विद्युतीकरण असेही काम होणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संचित धुमाळ यांनी दिली.
येथे होणार आहेत ही शौचालये
गोडोलीत भैरोबा मंदिराशेजारी, दुर्गा पेठेत तोफखाना परिसर, सदाशिव पेठेत जुनी भाजी मंडईत, सोमवार पेठेत तांबट घर येथे, बुधवार नाका येथे पाण्याच्या टाकीजवळ, मंगळवार पेठेत होलार वस्तीनजिक, मल्हारपेठेत भिंगारदेवे यांच्या घराजवळ बांधण्यात येणार असून प्रत्येकी एका शौचालयाकरता 36 लाख 37 हजार152 रुपयांचा खर्च येणार आहे. हे आम्ही सारे जनतेकरताच आमच्या नेत्यांनी दिलेल्या सुचनेनुसार करतो आहोत.
अनिता घोरपडे आरोग्य सभापती
आमच्या नेत्यांच्या सुचनेनुसार काम होणार
सातारा विकास आघाडीचे काम पारदर्शक आहे. लोकांच्या हिताचाच विचार करुन आम्ही कामे करतो. जी शौचालये उभारण्यात येणार आहेत. त्या शौचालयांना 24 तास पाणी असणार आहे. लाईट असणार आहे. तसेच कोणी त्याची तोडफोड करु नये साहित्य चोरुन नेवू नये करता केअर टेकरही असणार आहे. एवढे सारे पालिका करणार आहे.
यशोधन नारकर आरोग्य सभापती
महिलांच्यासाठीही शौचालय उभारण्यात येणार आहेत
आमच्याकडुन सर्व्हे करण्यात आला आहे. शहरात जेथे जेथे गरज आहे. त्या त्या जागेवर महिलांसाठीही सार्वजनिक अशी शौचालये उभारण्यात येणार आहेत. ज्या तांत्रिक अडचणी आहेत. त्या दुर करुन लवकरच आम्ही पालिकेच्या माध्यमातून ही शौचालये उभारण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कोणत्याही शहरवासियांची आमच्याकडून गैरसोय होणार नाही.