नगरसेवकाच्या कृपेने चाललेले अनाधिकृत खोके अतिक्रमण विभागाने हलवले

64
Adv

भुयारी गटर योजनेचे काम जुना आरटीओ चौक ते शिक्षक कॉलनी येथे सुरु आहे या कामात अडथळा ठरणारे खोके सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज तातडीने हटवले आहे

भुयारी गटार योजनेच्या च्या कामाला वेग आला असून पालिकेच्या एका नगरसेवकाच्या वरदहस्ताने हे खोके तिथे बसवण्यात आले होते या खोक्या मुळे भुयारी गटर योजनेच्या कामात अडथळा येत होता पालिकेचे नगरसेवक या खोक्यावर का मेहेरबान झाले हेच कळले नाही

राज्यात आपली सत्ता असून आपण काही केले तरी चालते त्याचे च उदाहरण दिसून आले राज्यात सत्ता असलेल्या एका पक्षाचे हे नगरसेवक असून ते पालिकेचे पक्ष प्रतोत असल्याचे समजते

नगरसेवकांनीच अतिक्रमणाला पाठीशी टाकल्यास कसा विकास होणार असा प्रश्न सातारकर नागरिकांना पडला आहे सातारा पालिकेच्या जागृत अतिक्रमण विभागाने खोके हटवल्याने आपण कोणाच्याही दबावाखाली काम करत नसल्याचे सिद्ध केले

Adv