आमदार व जिल्हाध्यक्ष यांच हाताची घडी तोंडावर बोट

501
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयात आज प्रथमच खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेत मात्र जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर त्यांनी एक चकार शब्दही न काढल्याने आळी मिळी गुपचळी तोंडावर बोट अशीच भूमिका पाहायला मिळाली

अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आज प्रथमच पत्रकार परिषद संपन्न झाली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी संदर्भात खासदार नितीन काकांनी सविस्तर माहिती दिली मात्र जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर व आमदार सचिन पाटील गप्प असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या

फलटणचे आमदार सचिन पाटील व जिल्हाध्यक्ष सोळसकर यांनी पत्रकार परिषद मौन बाळगल्याने बरेचसे प्रश्न उपस्थित झाले अशा कृत्यामुळे राष्ट्रवादी भविष्यात वाढणार कशी अशी चर्चा तिथे रंगत होती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज विविध निवडी केल्या मात्र या निवडी थेट प्रदेश कार्यालयाहून आल्या असल्याची माहिती खासदार नितीन काकांनी पत्रकार परिषदेत दिली एकंदरीतच या झालेल्या निवडीवर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना विश्वासात घेऊनच या निवडी झाला असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले

जिल्ह्यातील निवडी करण्याचा अधिकार जिल्हाध्यक्ष व इतर लोकप्रतिनिधींना नसेल तर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष व कार्यालयाची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय?

ज्या जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांना साधा तालुका अध्यक्ष निवडायचा अधिकार नसेल तर हे जिल्हाध्यक्ष सोळस्कर नामधारीच म्हणावे लागतील

Adv