महायुतीच्या विरोधात तुतारीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला मात्र तो अपयशी ठरलाआज मात्र राज्यसभेचे खासदार नितीन पाटील यांना तुतारीच्या कार्यकर्त्याची भुरळ पडली असल्याचे दिसून आले
मग स्वतःच्या कार्यकर्त्यांना होत असलेला त्रास हा फलटणगटाच्या राजे गटाने बोलून दाखवला होता त्यानंतर त्यांनी तुतारी हातात घेतली ती चूक नव्हती असेच म्हणावे का
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कार्यालयात चक्क तुतारीचा बॅच लावून काही कार्यकर्ते वावरत असताना दिसून आले त्यांच्याबरोबर फोटोसेशन केले ते मंत्री मकरंद पाटील यांचे बंधू राज्यसभेचे खासदार नितीन पाटील यांनी म नक्की कार्यकर्त्यांनी कोणाच्या विरुद्ध प्रचार करायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे चक्क खासदार महोदय यांनाच तुतारीच्या कार्यकर्त्यांची भरून पडली मूळ कार्यकर्ते बाजूला तर जाणार नाहीत ना अशी शंका उपस्थित होत आहे
नामदार मकरंद पाटील यांचे विरोधात तुतारी चिन्ह घेतलेलेच उमेदवार होते याचा विसर त्यांचे बंधू खासदार नितीन काकांना पडला की काय असा प्रश्न तेथील कार्यकर्त्यांना पडला होता चक्क खासदार महोदयांनीच अशा छोट्या मोठ्या नकळत चुका केल्या तर पदाधिकाऱ्यांनी काय करावे अशी परिस्थिती उद्भवू शकते