सातारा जिल्ह्यात आचार संहिता पथकाद्वारे 11 लाख 67 हजार रोख रक्कम जप्त  

49
Adv

आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन होण्यासाठी जिल्ह्यात  स्थिर पथके, व्हीव्हीटी तर व्हीएसटी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 10 ऑक्टोबर 2019 पर्यत स्थिर पथकाद्वारे 11 लाख 67 हजार रोख रक्कम जप्त केल्याची माहिती आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने अशी माहिती  आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.

यात स्थिर पथकाद्वारे 256 वाई मतदारसंघामध्ये दि. 25 सप्टेंबर 2019 रोजी पाडेगाव टोल नाका, खंडाळा 92 हजार रुपयांची रक्कम, 260 कराड दक्षिण मतदारसंघामध्ये दि. 9 ऑक्टोबर रोजी 2 लाख 50 हजार रुपयांची रक्कम स्थिर पथक क्र. 3 येळगाव उंडाळे येथे जप्त करण्यात आली, 255 फलटण मतदारसंघामध्ये दि. 9 ऑक्टोबर रोजी 5 लाख 20 हजार रुपयांची रक्क्म राजुरी बरड येथील स्थिर पथकाद्वारे व दि. 10 ऑक्टोबर रोजी जिंती नाका स्थिर पथकाद्वारे वाहन 1 लाख 25 हजार रुपये असे एूकण 9 लाख 87 हजार रुपये जप्त करण्यात आले.

तर पोलिस पथकाकडून दि. 28 सप्टेंबर 2019 रोजी 259 कराड दक्षिण मतदारसंघामध्ये दत्त चौक, पुसेगाव 1 लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

Adv