सातारा जिल्ह्यात आपणाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने काम करत आहात. परंतु अनेक ठिकाणी लॉकडाउन पाळला जात नाही. अनेक ठिकाणी रोज जीवनावश्यकच्या नावावर नागरिक घरातून बाहेर पडत आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिक घरातून बाहेर पडत असून, लॉकडाउन संपला आहे की काय ? अशी सध्याची प्रत्येक तालुका स्तरावरील परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यात दररोज नवीन रुग्णांची वाढ होत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तब्बल १७ पर्यंत पोहोचली आहे. महोदय गेल्या १ महिन्यापासून अनेक सामाजिक लोक गरीब, गरजू व परप्रांतीय लोकांची भूक भागवत आहे.
मात्र जिल्हा प्रशासन कोणत्याही प्रकारची गरजूंना मदत पुरवीत नसल्याचे समोर आले आहे. २ वेळच्या जेवणासाठी खरे गरजू देखील घराबाहेर पडत आहे. त्यांसाठी आमची मागणी आहे की, आपण जिल्हा नियोजन समिती (DPC) च्या निधीमधून स्वयंपाकाचे साहित्य अन्नदान करणाऱ्या सामाजिक संस्थाना द्यावे. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा प्रशासनच्या वतीने अन्नछत्र केंद्र सुरु करावे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पालिका व नगर पंचायतीच्या माध्यमातून गरजूं नागरिकांची यादी तयार करावी व ३ मे पर्यंत लॉकडाउन शिथिल न करता नागरिक बाहेर येणार नाहीत यासाठी कड़कड़ीत लॉकडाउन पाळला जावा यासाठी उपाययोजना कराव्यात ही आपणास विनंती करत असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे
जिल्ह्यातील अनेक नागरिकांना ३ मे पर्यंत तांदूळ, गहु, ज्वारी, तेल, डाळी इत्यादीची उपलब्धता झाली नाही. रेशन दुकानदार लोकाना अनेक प्रकारचे प्रश्न विचारुन हैरान करत आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिक जीवनावश्यक वस्तुंपासून वंचित राहत आहेत. नुकताच सातारा नगरपालिकाचा एक संदेश फिरत होता की कोणीही उपाशी असेल तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा. परंतु प्रत्यक्षात नागरिकांना अन्नदान करण्यासाठी कोणताही निधी नगरपालिकेकडे आला नाही. यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिला तर अन्नदान करणाऱ्या सामाजिक संस्थांकडील देखील साहित्य संपेल आणि लोक उपाशी राहतील. म्हणून आमची विनंती आहे की, जिल्हा प्रशासनकडून नागरिकांना कोणत्याही अटी-शर्तीविना ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना २ महिन्याचे रेशन आणि ज्यांच्याकड़े रेशन कार्ड नाहीं अश्या गरीब गरजू नागरिकांना आपण जिल्हा नियोजन समिती (DPC) चा निधी वापरून विविध ठिकाणी अन्नछत्र उभे करुण नागरिकांना घरपोच जेवणाची सोय करावी ही आपणास कळकळीची विनंती.