राष्ट्रवादी दोन गट निर्माण झाल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांचे वजन चांगलेच वाढले असल्याचे मुंबईतील बैठकीत दिसून आले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील महिला विकास मंडळ या ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्टेजवर प्रमुख मान्यवरांमध्ये आमदार मकरंद पाटील यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांचे अजित दादा गटात वजन वाढले असल्याचे दिसून आले
मंत्रिमंडळ विस्तारात प्रमुख्याने अजितदादा गटाकडून आमदार मकरंद पाटील यांचे नाव आघाडीवर असून त्याचेच हे संकेत तर नव्हे ना अशी चर्चा आमदार मकरंद पाटील यांच्या तालुक्यात रंगली आहे