सातारा जिल्ह्यातील हॉटेल व ढाबे रात्री दहा नंतर बंद करावेत असे पत्रक काढले असले तरी खिंडवाडी ते लिमखिंड या हायवेवरील चहाचीटपरी भुर्जीपावचे गाडे ही बंद करावेत अशी मागणी सातारकर नागरिक करत आहेत
रात्री दहा नंतर हॉटेल व्यवसायिकांनी आपले हॉटेल व ढाबे बंद करावेत असे एक प्रसिद्ध पत्रक जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काढले असून यामध्ये हायवेवरील भुर्जी पाव व चहाच्या टपऱ्याचा समावेश नसून अलीकडच्या काळात याच भुर्जीपावच्या चवीपायी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत काही युवकांमध्ये येथे मोठ्या प्रमाणात भांडण सुद्धा झालेले असल्याने लिमखिंड ते खिंडेवाडी या परिसरातील हायवे वरील भुर्जीपाव व चहाचे गाडे ही पोलीस प्रशासनाने रात्री दहा नंतर बंद करावेत अशी मागणी जोर धूर लागली आहे
भुर्जीपाव व चहाच्या नादामध्ये साताऱ्यातील बरेच युवक मोठ्या प्रमाणात रात्री 10 नंतर लिबखिंड ते खिंडवाडी येथील भुर्जीपावच्या गाडीवर आढळून येतात कालांतराने याच काही गाड्यांवरती युवकांमध्ये वादावाद होऊन मारामारीत रूपांतर होऊन काही युवकांना आपला जीव गमवावा लागला या बुर्जी पावच्या गाड्यांवरती ही कडक कारवाई करून हे गाडे रात्री दहा नंतर बंद कराव्यात अशी मागणी सातारकर नागरिक करत आहेत