एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारा कडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांचे नाव चर्चेत असून तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष
पदासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी कोरेगाव चे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव चर्चेत असून मंत्रिमंडळ विस्तारा नंतर प्रदेश अध्यक्षपदचा निर्णय होणार असून प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची वर्णी लागली तर जिल्ह्याचा फायदाच होणार आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे आले असून पृथ्वीराज चव्हाण यांना हे पद मिळाल्यास जिल्ह्यातून दोन्ही पक्षांचा कारभार चालणार असल्याचे दिसून येते
माजी खासदार प्रतापराव भोसले , स्वर्गीय प्रेमलाकाकी यांच्यानंतर जिल्ह्याला कॉंग्रेस पक्षाकडून कोणाला ही प्रदेशाध्यक्षपद मिळाले नाही आता दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच हे पद येणार की नाही याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे
दोन्ही काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद हे आपल्या जिल्ह्याला मिळाल्यास त्याचा फायदा नक्कीच होईल व दोन्ही काँग्रेसची ताकत मात्र अजूनच वाढेल यात तिळमात्र शंका नाही