ओला दुष्काळ संदर्भात संयुक्त पुरोगामी महाआघाडी चे राज्यपालांना निवेदन

78
Adv

महाराष्ट्रात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस हा गेल्या 40 ते 45 वर्षातील उच्चांकी पाऊस असून याती अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे प्रामुख्याने खरीप हंगामातील कापूस भात सोयाबीन मका तूर ज्वारी बाजरी भुईमूग कांदा या प्रमुख पिकांसह कडधान्यांचे पीक ही उद्ध्वस्त झाले आहे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे

राज्यातील शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन शेती साठी उभा केलेला पैसा पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर कर्जाची परतफेड आणि रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरही राज्यात सरकार स्थापन झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना व जनतेला दिलासा द्यायला कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मुख्यमंत्री महोदय यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी अनेक भागात सुरु झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे राज्यावर आलेल्या या संकटकाळात राजकारण बाजूला ठेवून त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे आमचे कर्तव्य समजतो असे मत संयुक्त पुरोगामी आघाडीने निवेदनात म्हटले आहे

Adv