Friday, May 1, 2026
spot_img
Home Maharashtra राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

119
Adv

राज्यसभेच्या 18 रिक्त जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. यासंदर्भात सोमवारी निवडणूक आयोगाने घोषणा केली. या जागांसाठी मार्च महिन्यातच मतदान होणार होते. मात्र, कोरोना व्हायरस महामारी आणि देशव्यापी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ते टाळण्यात आले. मात्र, आता लॉकडाउनमध्ये मोकळीक दिली जात असल्याने निवडणूक आयोगाने या जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.

गेल्या फब्रुवारी महिन्यात आयोगाने 17 राज्यांत 55 जागा भरण्यासाठी निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर मार्च महिन्यात 10 राज्यांत 37 जागा बिनविरोध भरल्या गेल्या. तर आता 18 जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

यात आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या प्रत्येकी 4 जागा, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या प्रत्येकी 3 जागा, झारखंडच्या 2 आणि ईशान्येकडील राज्यांतील मेघालय आणि मणिपूरच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या जागांसाठी 19 जूनला सकाळी 9 वाजता मतदान सुरू होईल.

Adv