पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा नुकतीच पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विशेष कौतुक*केले दोन्ही राजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शाही स्वागत केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथील सभेत उदयनराजे भोसले यांनी केलेल्या भाषणाला स्वत: मोदींनी दाद दिली. ऐकतंच राहावं, ऐकतंच राहावं असं उदयनराजे बोलत होते, असे मोदी म्हणाले.सैनिक स्कूल मैदानावर सुरू असलेल्या सभेत उदयनराजेंनी पंतप्रधान मोदींचे शाही स्वागत केले. त्यानंतर बोलताना उदयनराजेंनी मोदींचे कौतुक करत काँग्रेस- राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. 370 कलमाबाबतच्या निर्णयाचे त्यांनी जोरदार समर्थन केले. मराठा आरक्षणावरूनही त्यांनी नाव न देता शरद पवारांवर टीका केली. त्यानंतर मोदींनी उदयनराजेंच्या भाषणाचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मिल्ट्री अपशिंगे, कास पठार, वजराई धबधबा असे विविध भागांचा उल्लेख केला पुर्ण सातारा शहर हे भाजपामय झाले होते