शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यात यावे तसेच पिकविमा कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.*

74
Adv

पश्चिम महाराष्ट्रात जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने हाताशी आलेली खरिपाची पिके पावसाच्या कचाट्यात सापडली व त्यामुळे पिकांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान झालेले शेतकरी हे नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु मागील वर्षी झालेल्या पीकाच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून अद्याप पर्यंत मिळालेली नाही.
यावर्षी राज्यातील सर्वात जास्त पावसाची नोंद पुणे जिल्ह्यात झाली. शेतकऱ्यांना पेरणी व मशागतीची कामे करताना खूप अडचणींना सामना करावा लागत आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड केली. परंतु गेल्या महिन्याभरापासून परतीच्या पावसाने हाता-तोंडाशी आलेली पिके शेतातच उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक शेत जमिनींची बांधबंदिस्ती व मातीसुद्धा वाहून गेली आहे. पुणे जिल्हयातील अंदाजित एकूण २१ हजार ६८१ हेक्टर पेक्षा ज्यास्त लागवडी खालील क्षेत्र बाधीत झाले असून १३ तालुक्यातील शेतजमिनीचा यात समावेश आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली या तालुक्यातील भात,ऊस, सोयाबीन,फळबागा,फुलबागा अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. पंचनामे करण्यासाठी शासकीय यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे समोर येत आहे.
झालेल्या पीक नुकसानीमुळे पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची समोर आले आहे.
महसूल क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खरीब व रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येवून तात्काळ नुकसानभरपाई मिळण्याबाबत तसेच शिरूर तालुक्यांतील दोन शिरूर तालुक्यांतील एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत मिळणेबाबत आज महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती मा.ना.डाॅ.नीलम गोऱ्हे या संदर्भात मुंबई विधानभवन उपसभापती दालनात श्री. राम गावडे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख ग्रामिण पुणे जिल्हा यांच्या शिष्टमंडळासह या विषयी भेट घेतली.यावेळी नीलम गोऱ्हे बोलतांना म्हणाल्या प्रत्येक तालुक्यात पिक विमा कंपन्यांना शासनानी निर्धारीत केल होत त्या नूसार शेतकऱ्यांना पिकविमा अतिवृष्टीमुळे पिकांना व फळबागायती त्वरीत नुकसान भरपाई मिळण्यात यावी याविषयी विभागीय आयुक्तांना पाठपुरावा करावे असे निर्देश देण्यात आले.
•*ज्या शेतंकऱ्याचे रब्बी हंगामातील नुकसानीचे पंचनामे वेगाने करण्यात येवून तात्काळ नुकसान मिळावे.*
•*आत्महत्या शेतकरी कुटुंब आहे त्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी.*
•*आत्महत्या शेतकऱ्यांचे निधनाचे पंचनामे आणि अहवाल तात्काळ करण्यात यावे व अहवाल महसूल प्रशासनास सादर करण्याचे निर्देश पुणे जिल्ह्यातील खेड आणि शिरूर पोलीस स्टेशन अधिकारी यांच्याशी दूरध्वनी संपर्क साधून दिले आहेत.*
•*जिल्हापरिषदेच्या वतीने शेतकरी समुपदेशन व स्व मदत गट तयार करावा जेणे करून एकमेकांना मदत करू शकेल या बाबतीत जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना सुचना देण्यात आले.*
•*विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमाच्या परतफेड न करता काही तरी मार्ग कडून शेतकऱ्यांना फसवत आहेत. इंफकॉ टोकियो कंपनी आणि बजाज इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्या ह्या पुणे जिल्ह्यासाठी निर्धारित केल्या असलेमुळे या कंपन्यांनी 2018 मध्ये किती विम्याची मदत वाटप केली व किती रक्कम नाकारली यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी.*
•*शासन स्थरावरून ओला दुष्काळ जाहीर होण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांची वसुली तात्काळ थांबवावी.*
या भेटीत पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शेतकरी
श्री. राम सदाशिव गावडे,देवाची आळंदी खेड तालुका जि.पुणे. श्री.राम मच्छिंद्र गावडे,टाकळी हाजी तालुका शिरुर.जि.पुणे. श्री.स्वप्नील वसंतराव कुंजीर पाटील,रा.कुंजीरवाडी तालुका हवेली. श्री.ॲड.गणेश नारायण सांडभोर,खेड तालुका श्री.सोमनाथ रमेश न्हावले,रा.कुंजीरवाडी,तालुका हवेली.श्री. संदीप दत्तात्रय मुळीक,(राजगुरुनगर).श्री.न्यनेश्वर शिवराम कड, कडाचीवाडी. श्री.रमेश विट्ठल शिंदे,चाकण शहर पुणे.श्री.चंद्रकात बाळासाहेब कुंजीर, कुंजीरवाडी हवेली पुणे. यावेळी भेटीला उपस्थित होते.

Adv