ऐतिहासिक ‘सुप्रीम’ निकाल : अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच

78
Adv

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. ऐतिहासिक अयोध्येची जागा रामलल्लाचीच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज (शनिवार) स्पष्ट केले. तसेच मुस्लीम पक्षकारांनाहि वादग्रस्त ६७ एकरातील ५ एकर जागा देण्यात यावी, असेही निर्देश दिले आहेत.  आज सकाळी १०:३० वाजता या प्रकरणी निकाल वाचनाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने याची सुनावणी केली. त्यानंतर आज त्याच्या निकालपत्रावर या सर्व न्यायाधीशांनी सह्या केल्या.
निकाल वाचनाला सुरुवात झाल्यानंतर काहीच वेळात न्यायालयाने शिया वक्फ बोर्डानं फैजाबाद न्यायालयाच्या १९४६मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने याची सुनावणी केली. त्यानंतर आज त्याच्या निकालपत्रावर या सर्व न्यायाधीशांनी सह्या केल्या.

यानंतर श्री रामांचा जन्म याच भूमीत झाला असल्याचे न्यायलयाने मान्य केले. राममंदिर १२ व शतकातील रामाचा जन्म अयोध्येतच झाला. यावर वाद नाही. या जागेवर हिंदुपुजाच सुरु होती. या जागेवर चौथरा आणि सीता की रसोई होती हे मान्य असून हिंदूचा दावा खोटा नसल्याचेही न्यायलयाने स्पष्ट केले. मंदिर आणि मशिदीच्या बांधकामामध्ये ४०० वर्षांचे अंतर असून मुस्लीम त्या जागेला नमाज पठणाचे स्थळ मानतात तर त्या जागेवर प्रभू रामचंद्रांचा जन्म तिथं झाल्याची हिंदूंची श्रद्धा असल्याचे न्यायलयाने स्पष्ट केले.

या जागेवर इस्लामिक हक्क सांगणाऱ्या मुस्लीम बोर्डाने केलेला दावा मान्य नाही. खोदकामात इस्लामिक ढाचा असल्याचे पुरावे आढळले नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रामजन्मभूमी वादाचा निकाल अपेक्षित असून, या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दोन्ही धर्माचा आदर करण गरजेचे असून मुस्लिमांना पर्यायी जागा देणे अत्यंत गरजेचे आहे, अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात आली.

Adv