दादांच्या राष्ट्रवादीला चव्हाण साहेबांच्या विचारांचा विसर

34
Adv

जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या घड्याळाची चावी आता चक्क एका दुसऱ्याच पक्षातील माजी खासदाराच्या हाती पहायला व ऐकायला मिळते त्यामुळे मंत्रीपद खासदारकी जिल्हाध्यक्षपद हे नावालाच का असा प्रश्न आता जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे

सातारा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता मात्र आता दुसऱ्या पक्षाच्या माजी खासदाराच्या हातात घड्याळाची चावी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

मंत्रालय असो विधानमंडळ असो किंवा अधिवेशन जिकडे तिकडे राष्ट्रवादीच्या मंत्री महोदयांपेक्षा एका पक्षाच्या माजी खासदारां च्याच मागे राष्ट्रवादीचेचं आमदार जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी आपल्याला चालताना पाहायला मिळतात यावरून एकच तर्क निघतो की राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चाव्या आता दुसऱ्या पक्षातील माजी खासदारांच्या हातातच दिल्या गेल्या आहेत

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन आम्ही पक्ष चालवतो असे उपमुख्यमंत्री अजित दादा वारंवार सांगतात मात्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांच्या वारशाचा विसर या सन्माननीय आमदार व जिल्हाध्यक्ष आधी लोकांना पडलेला दिसतोय त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीच्या घड्याळाला पुन्हा नवीन उभारी घेऊन घड्याळाचे टिकटिक पुन्हा वाजवण्याची संधी निर्माण करावी लागणार आहे

Adv